14 Jan 2015

क्या कहेंगे लोग

दुनिया का सबसे बडा रोग
क्या कहेंगे लोग ……….
जिंदगी मी आप जो करना चाहते है
जरूर किजिए ………….
ये मत सोचिए कि लोग क्या कहेंगे
क्योंकी लोग तो तब भी कुछ कहते है
जब आप कुछ नाही करते ……।

प्रेम

श्वासाला गरज असते फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची,
जगण्याला गरज असते पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची,
प्रेमाला गरज असते भावनेची
नव्हे वारंवार भेटण्याची
प्रेम असंच करायला हवं
कि गरजचं उरणार नाही
पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची …………

आठवण

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही
दिवस येतात जातात पण मन कुठेच लागत नाही
पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळे होत नाही
आठवण येत नाही असं कधी झालच नाही
आठवण्यासाठी विसरावं लागत विसरता मात्र आलंच नाही