3 Jun 2013

हसणं





                ती तिची खास स्टाईल तिला जेव्हा एखाद विधान पटत नाही तेव्हा ती खूप हसत राहते त्या हसण्याने ती तुमच्यातली हवा काढून टाकते . मी तिला म्हणालो ' तुझं हे हसणं क्लोरोफार्म सारखं आहे समोरच्या माणसाला आपण फारच येडपटा सारखं बोललो कि काय असं वाटायला लावायचं आणि मग तो सावध व्हायच्या आत त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असं हे तंत्र आहे .'




                                                                        - व पु काळे 

2 Jun 2013

तू हवा होतास ……….

मन बरसताना माझे तू हवा होतास
ओल्या ओठांवरल्या दवाला
तू हवा होतास ……….

ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास ……….

पावसाळ्यातला एकटेपणा निसरडी माती
उडणारा पदर तुझ्यासाठी थांबला होता
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास ……….

हिरवाई सगळीकडे झाडं वाढली चिक्कार
काट्यात झुलणारा गुलाब तुझ्यासाठी थांबला होता
त्याच्या सुवासाला तू हवा होतास ………। 

आठवण

विसरावं म्हटलं तरी
विसरता येत नाही ,
दिवस येतात जातात पण
मन कुठेच लागत नाही
पाऊस पडून गेला तरी
आठवणींचे आभाळ
मोकळे होत नाही
आठवण येत नाही
असं कधी झालंच नाही
आठवण्यासाठी विसरावं लागतं
विसरता मात्र आलंच नाही ……………।