15 Jan 2013

सूत्रसंचालन - २

-->
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
महाराष्ट्राच आराध्य दैवत आई तुळजा भवानी बुद्धीची देवता राजाधिराज गणरायाला वंदन केल्यानंतर मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक जनक राष्ट्रीय रत्न माधुसुदंजी सत्पाळकर साहेब यांना अभिवादन या विभागीय कॉन्फरन्स साठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले तुम्ही सर्व तुम्हालाही माझा जय मैत्रेय .................!!!
आकाशी हृदयाच्या उडती 
बेधुंद मनाचे थवे 
अलगद मनाच्या क्षितिजावर वसते 
मैत्रेयचे एक गाव नवे...............!! 
संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर या पेंडॉल रुपी मैत्रेयच्या गावात मी सौ रोहिणी माने आपणा सर्वांचे तीलगुळा च्या गोडव्याने स्वागत करते 
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,

कणभर तीळ, मनभर प्रेम

गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा

"तिळ  गुळ घ्या आणि गोड गोड बोला."
           मित्रहो आपण मैत्रेय उद्योग परिवारात सामील झालात मैत्रेय उद्योग परिवार कसा आहे ? याची सुरक्षितता काय ? इथं खरंच करिअर मिळत का ? तसेच आपल्या सारखेच काही प्रतिनिधी सिल्व्हर मेडलचे मानकरी झालेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मैत्रेय उद्योग परिवाराची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सर्वजन एकत्र आलोत 
           मित्रांनो या देशाला जर महासत्ता बनायचे असेल तर या देशातील प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्त्पन्न वाढलं पाहिजे तो सक्षम झाला पाहिजे आणि या देशातील नागरिक हा जर बेरोजगारीने दुर्बल होत असेल तर तो सक्षम कसा होणार म्हणून या देशातील नागरिकांना बेरोजगारीच्या विळख्यातून सोडवण्यासाठीच आणि नवा भारत घडवण्यासाठीच दूरदर्शी आणि सर्वस्पर्शी अशा मैत्रेय उद्योग परिवाराचा जन्म झाला.
"इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी "
या संत उक्तीप्रमाणे आज हा मैत्रेय उद्योग परिवार खरोखरच गगनाला भिडलेला आहे . खूप काही करायचं, घडवायचं, प्रगतीशील बनण्याचं ध्येय मनाशी बाळगून तुम्ही जर मैत्रेय उद्योग परिवारात सामील झाला असाल तर नक्कीच तुमचीही स्वप्न साकार होतील कारण या परिवाराच ब्रीदवाक्यच आहे " इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो
           आपलं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळण यावर आपलं यश अवलंबून असतं आणि आज असेच जीवनरूपी डाव जिंकलेले मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत काही काही क्षणातच सर्व मान्यवरांचे या हॉंल मध्ये आगमन होणार आहे तरी कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे

---------------------------------------आगमन-------------------------------------------- 

                मान्यवरांना आसन ग्रहण करण्याची विनंती करते .

    मनुष्याची श्रेष्ठता हि त्याच्या कर्तबगारीने ठरते व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तुत्ववान मान्यवरांचे आज या विभागीय कॉंन्फरंस साठी वेगवेगळ्या विभागातून उपस्थित असलेल्या सर्व बंधू  भगिनी सहकार्यांचे मी सौ रोहिणी माने पुन्हा एकदा मन पूर्वक स्वागत करते .
मी आवर्जून सांगते मुलगा आणि वडील होते वडिलांना काहीतरी काम करायचे होते मुलगा काम करू देत नव्हता सारखा त्रास द्यायचा वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्यातरी कामात गुंतवल पाहिजे त्याशिवाय मला काम करता येणार नाही समोर एक जगाचा नकाशा पडला होता वडिलांनी हातात घेतला टराटरा फाडला दहा बारा तुकडे केले मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितले सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक मगच माझ्याकडे ये वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास तरी लागेल आणि तेवढ्या वेळात आपले काम आटोपून पुरे होईल मुलगा नकाशा जोडायला बसला वडील कामाकडे गेले पण कामा पर्यंत पोहचातायेत पोहचातायेत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला बाबा नकाशा जोडून झाला वडिलांना आश्चर्य वाटलं इतक्यात कसकाय जमलं तुला ? मुलगा म्हणाला बाबा ज्या नकाशाचे तुकडे तुम्ही मला दिले होते त्या नकाशाच्या मग एका माणसाच चित्र होत मी माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं  होत आज समोर नजर टाकली तर लक्षात आलं मैत्रेय मुले सबंध समाज जोडला गेलाय आजचा दिवस उलटू द्या उद्या संपूर्ण जग जोडल्याच तुम्हाला याच देही याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही
                     
सत्पाळकर साहेबांनी आयुष्यभर एकच वसा पेलला आणि तो म्हणजे माणूस जोडण्याचा अस आदर्श जीवन जगणार्या इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करणार्या आदरणीय मधुसूदन रामाकांत्जी सत्पाळकर साहेब यांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करते 
-------------------------------------प्रतिमा पूजन -------------------------------------
             मन शांत प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन शांती मिळते अशा वेळी सभोतालचे जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो म्हणूनच दुखीतांच्या जीवनातील दुख दूर व्हावे या आशयाची कवी वसंत बापट यांची सत्पाळकर साहेबांना प्रिय असणारी कविता आपण प्रार्थना म्हणून घेणार आहोत ------------------------------------------प्रार्थना------------------------------------------
धन्यवाद!!
मान्यवरांना मी आसन ग्रहण करण्याची विनंती करते 
 यानंतर वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत .
-----------------------------------------
सत्कार ---------------------------------------

यानंतर श्री ............................................................. यांना मी कार्यक्रमाच प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते
------------------------------------प्रास्ताविक ----------------------------------------

--------------------------------------मार्गदर्शन ---------------------------------------