18 Nov 2012
भर दिवसा सूर्यास्त..............
' न भूतो न भविष्यती '
तब्बल पाच दशके मराठी अस्मितेचा हुंकार बनलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईतील शिवाजी पार्कवर रविवारी संध्याकाळी ' न भूतो न भविष्यती ' जनसागराने महानिरोप दिला, तेव्हा आर्त भावनांचा कल्लोळ आवघ्या महाराष्ट्राच्या मनामनांत दाटून आला ......... ' बाळासाहेब परत या ...............' असा हंबरडा शिवतीर्थालाही फुटला .............. लौकिक शब्द तोकडे पडावेत, अशी अलौकिक मानवंदना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील मराठी माणसाने बाळासाहेबांना दिली ...............
साहेब तुम्ही पोरके केले आम्हाला .......................
आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...
अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल ...
आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...
शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...
तुतारीतून निघणारे सूर वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...
वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून हमसून रडेल ...
भावपूर्ण श्रद्धांजली ...
साहेब तुम्ही पोरके केले आम्हाला - मराठी माणूस
Subscribe to:
Posts (Atom)